पाचोरा व भडगाव तालुक्यातील 3 हजारावर बेरोगारांना मिळणार रोजगार
By Admin | Updated: May 25, 2017 15:59 IST2017-05-25T15:59:39+5:302017-05-25T15:59:39+5:30
सात हजार तरुणांनी केली मेळाव्यात नोंदणी
पाचोरा व भडगाव तालुक्यातील 3 हजारावर बेरोगारांना मिळणार रोजगार
ऑनलाईन लोकमत
पाचोरा,दि.25 - तरुणांनी कामाची लाज न बाळगता आपली मानसिकता बदलल्यास रोजगाराच्या अनेक संधी असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथे शिवसेनेतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात केले. यावेळी 7 हजारावर अर्ज आले होते. यापैकी 3326 जणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
यावेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटिल , जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रभाकर हरडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुनील दामले, एस एस इखारे, विक्रांत बगाडे, आनंद विद्यागर, नीलेश अग्रवाल ,सुनील पाटील तसेच उपनगराध्यक्ष शरद पाटे, तहसीलदार बी.ए.कापसे, रावसाहेब पाटील, सुरेश पाटील, भरत खंडेलवाल, राजू पाटील शिवसेनेचे सर्व नगरसेवक,पंचायत समिती व जि. प. सदस्य उपस्थित होते.
या मेळाव्यात राज्यभरातील 32 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. विविध पदासाठी 3326 रिक्त जागांवर बेरोजगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी सात हजार बेरोजगार तरुणांनी नोंदणी केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. विविध कंपन्यासाठी स्वतंत्र मंडपची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात मुलाखतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी तर आभार गणेश पाटील यांनी मानले.