सातगाव तांडा येथील तरुणांनी दारूबंदीसाठी पुकारला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:20+5:302021-08-26T04:20:20+5:30
तांड्यासह अनेक गावांमध्ये गावठी दारू विकल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याला पोलीसही तितकेच जबाबदार असून, गावठी दारू बंद करण्यासाठी ...

सातगाव तांडा येथील तरुणांनी दारूबंदीसाठी पुकारला एल्गार
तांड्यासह अनेक गावांमध्ये गावठी दारू विकल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याला पोलीसही तितकेच जबाबदार असून, गावठी दारू बंद करण्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनीच कंबर कसण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तांडा येथील तरुणांनी सुरुवात केल्याचे मानले जात आहे.
तांडा येथे दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, यापुढे अजून किती कुटुंबांचा उद्ध्वस्त गावाने बघायचा? या भावनेतून तरुणांनी दारू बंद करण्यासाठी संबंधित दारू विक्री करणाऱ्यांकडून दारूने भरलेली कॅन हिसकावून गावातून मोर्चा काढला आणि मोकळ्या मैदानात नेऊन दारू भरलेल्या कॅनला पेटवून देण्यात आले. यापुढे जर दारू विकणाऱ्याने गावात दारू विकली तर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, असाही तरुणांनी दम भरला.