कृषी विद्यापीठासाठी ‘एल्गार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2015 00:10 IST2015-10-24T00:10:40+5:302015-10-24T00:10:40+5:30
धुळ्यात कृषी विद्यापीठ झालेच पाहिजे, यासाठी एकत्रितरित्या प्रय} करू. तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी शुक्रवारी सायंकाळी आयोजित बैठकीत घेतला.

कृषी विद्यापीठासाठी ‘एल्गार’
धुळे : सध्याचा काळ हा आधुनिक असलातरी येणारा काळ कृषीप्रधान राहणार आह़े धुळ्यात कृषी विद्यापीठ झालेच पाहिजे, यासाठी मतभेद विसरून एकत्रितरित्या प्रय माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी कृषी विद्यापीठ धुळ्याचे झाले पाहीजे यासाठी शुक्रवारी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत माजी कुलगुरू डॉ़ एऩ क़े ठाकरे यांच्या हस्ते प्रा.शरद पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल़े कार्यक्रमास एम़ जी़ धिवरे, श्याम सनेर, किरण पाटील, किरण शिंदे, अतुल सोनवणे, संजय शर्मा, रवी बेलपाठक, रवी देवांग, निरंजन भतवाल, सिद्धार्थ बोरसे, साहेबराव देसाई, कैलास पाटील, अविनाश मोरे, मनोज मोरे, संजय वाल्हे, अनिल मुंदडा यांच्यासह अन्य उपस्थित होत़े धुळ्यात कृषी विद्यापीठासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री आजच उपलब्ध असल्याने नव्याने करण्याची गरज नाही़ त्यामुळे शासनाचा खर्चही वाचणार आहे. कृषी विद्यापीठासाठी सर्वानी आपसातील राजकीय मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. हा जिल्ह्यातील अस्मितेचा मुद्दा आह़े सर्वपक्षीय दबाब निर्माण केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल़, असे विचार उपस्थितीत नेत्यांनी व्यक्त केले. बैठकीत यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने घेतला. एकनाथराव खडसेंची भेट घेणार धुळ्यात कृषी विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची सर्वपक्षीय नेते भेट घेतील़ त्यांच्यासमोर विद्यापीठाबाबतची भूमिका विषद करतील़ यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन माजी आमदार प्रा़ शरद पाटील यांनी याप्रसंगी केल़े