हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:48+5:302021-09-03T04:18:48+5:30
जळगाव : शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारून दहीहंडी ...

हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की...
जळगाव : शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. तर निवारा केंद्रातील आजी-आजोबांनीसुध्दा विविध वेशभूषा साकारून जन्माष्टमीचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.
विद्या इंग्लिश मीडियम स्कूल (३ सीटीआर ३४)
विद्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत ऑनलाइन पध्दतीने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धा, मुकुट तयार करणे, बासरी सजवणे, कॉर्नर डेकोरेशन, मटकी सजवणे, कृष्ण-लीला आधारित व्हिडिओ तयार करणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमात मुख्याध्यापक हॅरी जॉन व प्रशासिका कामिनी भट यांची उपस्थिती होती.
सरस्वती इंटरनॅशनल स्कूल (३ सीटीआर ३५)
सरस्वती इंटरनॅशनल स्कूल येथे सोमवारी जन्माष्टमी ऑनलाइन पध्दतीने साजरी झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका मालू सपकाळे यांची उपस्थिती होती. जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली़ त्यानंतर मुकेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांच्या परिसरात शिक्षक शिकविण्यासाठी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरी बेघर निवारा केंद्र (३ सीटीआर ३३)
भजे गल्ली भागातील शहरी बेघर निवारा केंद्र येथे जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी तेथील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा साकारली होती. त्यात कृष्ण, सुदामा, राधा, गोपिका आदी वेशभूषा साकारल्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवारा केंद्रातील आजी-आजोबांच्याहस्ते राधाकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी दीपाली कासार, मनोज कुळकर्णी, दीपक चौधरी, शीतल धनगर, आनंद शिरापुरे व अलका सोनवणे आदींची उपस्थिती होती.