सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:47+5:302021-03-27T04:16:47+5:30
नाशिकसाठी रात्रीची बस सेवा सुरू करण्याची मागणी जळगाव : जळगावहून नाशिकला जाण्यासाठी दुपारनंतर बसेस नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...

सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणा
नाशिकसाठी रात्रीची बस सेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगावहून नाशिकला जाण्यासाठी दुपारनंतर बसेस नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी प्रवाशांना जादा पैसे मोजून खाजगी वाहने व रेल्वेने जावे लागत आहे. त्यामुळे आगार प्रशासनाने जळगावहून नाशिकसाठी सायंकाळी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
जिल्हा रुग्णालयासमोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : जिल्हा रुग्णालया समोर खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करून हा रस्ता मोकळा केला होता. मात्र, मनपाची कारवाई थंडावल्याने पुन्हा या ठिकाणी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रुग्ण वाहिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
सोशल डिस्टनिंगचा फज्जा
जळगाव : कोरोनाबाबत मनपा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत असतांनाही, शुक्रवारी सायंकाळी बाजार पेठेत नागरीकांनी एकच सोशल डिस्टनींगचा फज्जा उडालेला दिसून आला. तसेच दुकानांमध्येही गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसून आले.
केळकर मार्केटमध्ये पथदिवे बसविण्याची मागणी
जळगाव : जुन्या नगरपालिकेच्या पाठीमागील केळकर मार्केट मध्ये व रस्त्यावर कुठेही पथदिवे नसल्यामुळे ग्राहकांची व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर अंधार असल्यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रात्रीवेळी चोरी-लुटणारीच्याही घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.