विद्युत तार अंगावर पडून शेतक:याचा मृत्यू

By Admin | Updated: June 24, 2017 17:46 IST2017-06-24T17:46:45+5:302017-06-24T17:46:45+5:30

चुंचाळे येथे विद्युत तार अंगावर पडून बाळद येथील उमेश रामकिसन झवर (वय 45) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

The electric wire falls on the farmer: its death | विद्युत तार अंगावर पडून शेतक:याचा मृत्यू

विद्युत तार अंगावर पडून शेतक:याचा मृत्यू

 ऑनलाईन लोकमत 

पाचोरा / बाळद,दि.24 : चुंचाळे येथे विद्युत तार अंगावर पडून बाळद येथील उमेश रामकिसन झवर (वय 45) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 24 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. 
उमेश झवर हे मुळचे बाळद येथील रहिवासी असून काही दिवसांपासून ते नगरदेवळ्यात वास्तव्यास होते. शेतातून ते घराकडे मोटरसायकलने जात असताना  पाऊस सुरु होता. यावेळी रस्त्यात त्यांच्यावर विद्युत तार पडल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. बाळदचे माजी सरपंच रवींद्र झवर यांचे ते लहान बंधू होत.  
वीज वितरणच्या हलगर्जीपणाचा बळी
वीज वितरण कंपणीच्या हलगर्जीपणामुळे उमेश झवर यांना आपले प्राण गमवावे लागल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. परिसरात अनेक जिर्ण व लोंबकळणा:या तार असून त्या बदलण्याची मागणी होत असतानाही लक्ष दिले गेले नाही. याची दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती असे बोलले जात आहे. या घटनेस संबंधित अधिका:यांना जबाबदार धरुन कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: The electric wire falls on the farmer: its death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.