गोंडखेल येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 17:45 IST2017-10-08T17:44:30+5:302017-10-08T17:45:42+5:30

जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज पडून योगेश गणेश पवार (वय-२२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Electric power rises in Gondkhel and dies of youth | गोंडखेल येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

गोंडखेल येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.८ : तालुक्यातील गोंडखेल येथे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज पडून योगेश गणेश पवार (वय-२२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
योगेश हा आई-वडिलांसह शेतात कापसाची वेचणी करीत होता. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज पडल्याने योगेश हा ठार झाला. तर एक मजूर जखमी झाला आहे. या घटनेबाबत गावात माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. योगेश याला जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ.वैशाली चांदा यांनी त्यांना मयत घोषित केले.

Web Title: Electric power rises in Gondkhel and dies of youth