शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

कृषी, सिंचन प्रश्नांवर निवडणूक झाली केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:50 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या प्रभावशाली मंत्र्यांच्या कृषी आणि सिंचन या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रान पेटविण्याचा विचार महाआघाडीचा दिसून येत आहे. शरद पवार यांच्या एरंडोल येथील सभेत प्रमुख भर हा या दोन प्रश्नांवर दिसूून आला. आणि जनतेचा मोठा प्रतिसाद यावेळी या दोन्ही प्रश्नांना मिळाला. निवडणूक या दोन विषयांभोवती केंद्रित करण्याचा विचार आता महाआघाडी करीत असणार.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नावर रान पेटविण्याचा महाआघाडीचा प्रयत्न अंतर्गत विरोधातून सावरताना भाजपची त्रेधातिरपीट; शिवसेनेच्या ‘कभी हां कभी ना’ भूमिकेने वाढविली चिंता

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत राफेल, राम मंदिर, एयर स्ट्राईक, गरिबांना ७२ हजार रुपये हे मुद्दे किती प्रभावशाली ठरतात, याचा अंदाज घेण्याचे काम सध्या रालोआ आणि महा आघाडीचे रणनितीकार करीत आहे. परंतु, खान्देशचा विचार केला तर कृषी आणि सिंचन या विषयांभोवती ही निवडणूक फिरु शकते, असे म्हणता येईल. केंद्र व राज्य सरकारातील भाजपच्या पाच वर्षांच्या काळात खान्देशातील शेती, प्रक्रिया उद्योग आणि सिंचन व्यवस्था या आघाडीवर समाधानकारक काम झालेले नाही. पहिल्या युती सरकारच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजची कामे सुरु झाली. परंतु, काँग्रेस आघाडीच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आणि युतीच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात बॅरेजेसचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत काही पोहोचले नाही. उपसा सिंचन योजना पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली झाल्या, पण त्यातून पाणी बांधापर्यंत गेले नाही.धुळे जिल्ह्यात सुलवाडे-जामफळ आणि अक्कलपाडाचे पाणी धुळे शहरासाठी आणण्याच्या योजनेविषयी पाच वर्षांत काही झाले नाही. आणि आता निवडणुकीपूर्वी कामे मंजूर केली असली तरी जनता त्यावर किती विश्वास ठेवेल, हा प्रश्न आहेच.तीच स्थिती जळगाव जिल्ह्यात आहे. हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या २५ वर्षांपासून तापी नदीवरील मेगा रिचार्ज योजना आणि गिरणा नदीवरील सात बलून बंधारे या दोन महत्वाकांक्षी योजनांचे राजकारण करीत भाजपने सत्ता उपभोगली. मात्र सत्ता येऊनही पाच वर्षात मंजुरी, सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल या पलिकडे हे काम गेलेले नाही. धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या निम्म्या भागासाठी जिव्हाळ्याचा प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाविषयी तर पाच वर्षात उदासिनता दिसून आली. हा प्रश्न सातत्याने लावून धरणारे साहेबराव पाटील ‘भाजप’मध्ये जाऊनही हा प्रकल्प जैसे थे आहे. वरखेडी-लोंढे प्रकल्पाची तीच स्थिती आहे. नार-पार योजनेचा लाभ, नदी जोड हे विषय यंदा गाजतील, असे चित्र आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ्यात दुष्काळाचा दाह माध्यमांच्या विषयपत्रिकेवरुन दूर झाला असला तरी उमेदवारांना प्रचार करताना ग्रामीण भागात तो जाणवत आहे. मतदार आता बेधडकपणे प्रश्न विचारत आहे. कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान, पीकविमा, वादळ-गारपीटीची नुकसानभरपाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाराटंचाई यासोबत खरेदी केंद्रांवर झालेली अडवणूक, बाजार समित्यांचे धोरण, महसूल विभागाकडून आॅनलाईनच्या नावाने होत असलेली अडवणूक या विषयांनी जनता त्रस्त झाली आहे.खासदार, आमदार या नात्याने या सर्वपक्षीय मंडळींनी पाच वर्षे काम केलेले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा केली जात आहे.‘संकटमोचक’ म्हणून महाराष्टÑभर ख्यातीप्राप्त झालेल्या गिरीश महाजन यांची त्यांच्याच जिल्ह्यात कोंडी करण्याचा प्रयत्न महाआघाडीने चालविला आहे. उत्तर महाराष्टÑातील आठ जागा निवडून आणण्याचा विडा महाजन यांनी उचलला आहे. परंतु, खान्देशातील चार जागांचा विचार केला तर लढाई पूर्वी वाटत होती, तेवढी सोपी राहिलेली नाही, हे निश्चित. एकनाथराव खडसे हे मुंबईत रुग्णालयात दाखल असल्याने रावेरमध्ये त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. जळगावात प्रचाराला उशिरा सुरुवात झाली आहे. धुळ्यात अनिल गोटे उपद्रव करतील. नंदुरबारात नटावदकरांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव