शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

निवडणुकांचा जळगावातील धान्याच्या आवकवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:12 IST

बाजारगप्पा : राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकांमुळे जळगावच्या बाजारपेठेत धान्याची आवक थांबल्याने बाजारपेठेत धान्याची कमतरता जाणवू लागली.

- विजयकुमार सैतवाल (जळगाव)

राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकांमुळे जळगावच्या बाजारपेठेत धान्याची आवक थांबल्याने बाजारपेठेत धान्याची कमतरता जाणवू लागली. मात्र मागणी नसल्याने भाव स्थिर आहेत. जळगावच्या बाजारपेठेत गहू, कडधान्य, बाजरीची आवक राजस्थान, मध्यप्रदेशातून होत असते. मात्र तेथे विधानसभेच्या निवडणुका असल्याने गेल्या आठवड्यापासून धान्याची आवक कमी झाली होती. सध्या खरेदीचाही हंगाम नसल्याने बाजारपेठेत धान्याला मागणी नव्हती. त्यामुळे आवक नसली तरी भाव स्थिर राहिले. बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. 

रबी हंगामात लागवड होणाऱ्या रबी ज्वारीच्या भावात वाढ सुरू असून, या आठवड्यात थेट  २०० प्रतिक्विंटलने ज्वारीच्या भावात वाढ होऊन ती ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३२०० ते ३४०० प्रतिक्विंटलवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात डाळींचे कमी झालेले भाव या आठवड्यात स्थिर राहिले, अशी माहिती जळगाव दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.  

दोन आठवड्यांपूर्वी ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या मुगाच्या डाळीत गेल्या आठवड्यात घट होऊन ती ७००० ते ७४०० रुपयांवर आली होती. या आठवड्यातही ती याच भावावर स्थिर आहे. उडदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६३००  रुपये प्रतिक्विंटल, हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४००  रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तुरीच्या डाळीच्या भावात वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात तूर डाळ ७००० ते ७४००  रुपये प्रतिक्विंटलवर आली.

या आठवड्यातही ती याच भावावर स्थिर आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव  ६६७५ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत. नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, छत्तीसगड, मध्यप्रदेशसह गोंदिया, तुमसर या भागातून नवीन तांदूळ येऊ लागला आहे. नवीन चिनोर तांदळाचे भाव ३००० रुपये प्रतिक्विंटल असून, जुन्या चिनोर तांदळाचे भाव ३४०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

गव्हाला मागणी वाढल्याने १०० रुपये प्रतिक्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात गव्हाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. १४७ गहू  २६५० ते २७५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. तसेच लोकवन गहू  २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू  २७५० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक लवकरच पुन्हा सुरू होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ज्वारी, बाजरीचे भावदेखील या आठवड्यात स्थिर आहेत. ज्वारीचे भाव २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल, बाजरी २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी