शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

निवडणुकीचा वाजला नगारा अन इच्छुक उमेदवारांचा राम राम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:40 IST

मुदत संपलेल्या एकूण ३३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लागला आहे.

अशोक परदेशीभडगाव : तालुक्यात मुदत संपलेल्या एकूण ३३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लागला आहे.  नामनिर्देशन पत्र ऑनलाईन दाखल करण्याचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे. राजकीय आखाडा चांगलाच तापण्यास सुरुवात झाली आहे. पॅनल प्रमुख उमेदवारांची निवड करीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पूर्वतयारी करताना दिसत आहेत.  निवडणुकीचा वाजला नगारा अन इच्छुक उमेदवारांचा झाला राम राम सुरू असे चित्र  तालुक्यात गावोगावी पहावयास मिळत आहे.या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. सध्या दि. २३ पासून नामनिर्देशन पत्र   दाखल करण्याचे काम सुरू आहे. २४  रोजी  दोन ग्रामपंचायतींसाठी  २ नामनिर्देशन पत्र  दाखल झालेले आहेत. यात भडगाव तालुक्यात मुदत संपणार्या या ३३ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. यात शिवणी, पिंपळगाव बुद्रूक, पिंप्रीहाट, आमडदे, भोरटेक बुद्रूक, सावदे, वडगाव बुद्रूक महिंदळे, वडगाव नालबंदी, वलवाडी बुद्रूक, वाक, भट्टगाव, पिचर्डे, बात्सर, पांढरद, मांडकी, आंचळगाव, कोठली, तांदळवाडी, वाङे, बाळद खुर्द, पळासखेडा , वरखेड, बांबरुड प्र.ब., जुवार्डी, वडजी, लोण प्रभ, पिंपरखेड, गिरड, बांबरुड प्र.उ., मळगाव, खेडगाव, बोदडे, या  ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने या ग्रामपंचायत निवडणुकांना ब्रेक लागला होता. सुरुवातीस ग्रामपंचायत वार्डातील जागांचे आरक्षण व वार्डरचना यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. अतिम मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सरपंच पदाचे आरक्षण प्रशासन केव्हा जाहीर करेल याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पॅनल बांधतांना पॅनल प्रमुखांना अडचणी येताना दिसत आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आतापासूनच राजकीय मंडळी पॅनलची बांधणी करीत आहेत. अनेक इच्छुक, नवखे निवडणूक लढविण्यासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. चांगला निवडून येणारा उमेदवार कोण? चांगला उमेदवाराचा शोध पॅनल प्रमुख मंडळी करीत इच्छुक उमेदवारांच्या बैठका पॅनलमार्फत गल्लींमध्ये होताना दिसत आहेत.  इच्छुक उमेदवारही मतदारांशी संपर्क साधताना नजरेस पङत आहेत. इच्छुक उमेदवार मतदारांना राम राम करून मतदान करण्यासाठी जणू आकर्षित करीत आहेत. सर्वत्र ‘राम राम’चा बोलबाला सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhadgaon भडगाव