ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 18:23 IST2017-10-07T18:16:38+5:302017-10-07T18:23:23+5:30

सावदा रेल्वे स्टेशनजवळील गाते येथे ग्रा.पं. निडणुकीसाठी मतदान करताना अचानक अस्वस्थ वाटल्याने रघुनाथ बंडू कोळी (वय-८०) यांचे घरी आल्यानंतर निधन झाले.

Elderly Death After Gram Panchayat Election | ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर वृद्धाचा मृत्यू

ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर वृद्धाचा मृत्यू

ठळक मुद्दे मतदान करताना अचानक अस्वस्थ वाटल्याने रघुनाथ बंडू कोळी यांचे घरी आल्यानंतर निधन झालेदवाखान्यात दाखल करीत असताना झाला मृत्यू

आॅनलाईन लोकमत
तासखेडा, ता.रावेर, दि.७ - सावदा रेल्वे स्टेशनजवळील गाते येथे ग्रा.पं. निडणुकीसाठी मतदान करताना अचानक अस्वस्थ वाटल्याने रघुनाथ बंडू कोळी (वय-८०) यांचे घरी आल्यानंतर निधन झाले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
गाते ग्रा.पं.साठी ७ रोजी मतदार प्रक्रिया सुरू असताना गाते येथील रघुनाथ बंडू (कोळी) गातेकर यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी रिक्षात बसवून आणण्यात आले. मतदान केंद्रात मतदान मशीनचे एक बटन दाबताच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने घरी आणण्यात आले. मात्र दवाखान्यात दाखल करीत असताना त्यांचा घरीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे आहेत.

Web Title: Elderly Death After Gram Panchayat Election