शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वृद्धेचा झोपेतच जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:50 PM

मध्यरात्री घडलेली घटना, पोलिसांनी केला पंचनामा

ठळक मुद्देजिजाबाई सोनवणे ही वृद्धा झोपडीत एकटीच राहत होतीमुलगा गावातच दुसरीकडे वेगळा राहतोकॉईलमुळे आग लागल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
आॅनलाईन लोकमत पारोळा, जि.जळगाव , दि...२४ : झोपडीत राहणाºया जिजाबाई पंडीत सोनवणे (६५) या वृद्धेचा झोपेतच जळून मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री बसस्थानकासमोर असलेल्या पेट्रोलपंपाच्या मागे घडली. जिजाबाई सोनवणे या बसस्थानकासमोरील ए.जी. कुळकर्णी पेट्रोल पंपामागे असलेल्या झोपडीत एकट्याच राहत होत्या. त्या धुणी-भांडी करून, स्वत:चा उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांचा मुलगा अशोक सोनवणे हा गावातच राजीव गांधी नगरात राहतो. तो खाजगी वाहनावर चालक असून, सध्या तो अजमेरला गेल्याचे सांगण्यात आले.जिजाबाई सोनवणे या रोज पहाटे लवकर उठायच्या. मात्र आज त्या न दिसल्याने, परिसरात राहणाºया मजूर महिलेने त्यांच्या झोपडीजवळ जाऊन बघितले असता, त्यांचा झोपडीतील खाटीवरच जळून मृत्यू झालेला होता. या घटनेची माहिती त्या महिलेने परिसरातील रहिवाशांना दिली. नागरिकांनी पोलीसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, हेड कॉन्स्टेबल बापू पाटील, नाना पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह कुटीर रूग्णालयात नेला.त्या वृद्धेच्या झोपडीशेजारी कोणीच राहत नसल्याने, मध्यरात्रीची घटना कोणाच्या लक्षात आली नाही. दरम्यान त्यांच्या खाटेच्या शेजारी डासांची कॉईल लावलेली होती. त्या कॉईलमुळे आग लागून वृद्धेचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत फक्त झोपडीचे वरचे छत थोडेफार जळालेले आहे. इतर नुकसान झालेले नाही. त्यामुळे पोलीस दुसºया दिशेनेही तपास करीत आहे.याप्रकरणी अद्याप पारोळा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आलेली नव्हती.