किरण चौधरीरावेर : तालुक्यातील बक्षीपूर येथील जेन्टस टेलर भास्कर वामन महाजन यांचे हदयविकाराने निधन झाल्याचा मानसिक धक्का बसला आणि त्यांची जन्मदाती वयोवृद्ध आई द्वारकाबाई वामन महाजन यांचे २ जुलै रोजी दुपारी अकस्मात निधन झाल्याने शोकाकुल महाजन परिवारासह बक्षीपूर गावावर दुहेरी शोकसावट पसरले आहे.बक्षीपूर येथील जेन्टस टेलरींग व्यवसाय करणारे भास्कर वामन महाजन (वय ४९) हे त्यांची सून मध्य प्रदेशात शिक्षिका असल्याने बºहाणपूर शहरातील गोविंदनगर येथे त्यांचा मुलगा, सून व पत्नीसह वास्तव्यास होते. बक्षीपूर येथील घर व शेती तथा रावेर ही कर्मभूमी मानून ते बºहाणपूर येथून रावेर येथील एका टेलरकडे ड्रेसच्या नगाप्रमाणे कामाला येत असत.दरम्यान, लॉकडाऊमध्ये त्यांचे रावेरला येणे-जाणे बंद झाले. घरात बसून रक्तदाब व पोटदुखीच्या आजाराने ते त्रस्त झाले. रविवारी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कोरोनाच्या सावटात खासगी डॉक्टरांनी त्यांना दाखल करून न घेतल्याने बºहाणपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचार घेताना त्यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर रसलपूर येथील वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, बºहाणपूर येथील ताप्ती मिल येथे सेवारत असलेला मुलगा, सून व पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेला अविवाहित मुलगा असा परिवार उघड्यावर पडला. यामुळे त्यांच्या जन्मदात्या आई द्रौपदाबाई वामन महाजन यांना आपल्या मुलाच्या निधनाचा मानसिक धक्का बसला. त्यातच त्यांचे गुरुवारी दुपारी तीनला देहावसान झाले. शोकाकुल असलेल्या त्या परिवारावर पुन्हा दु: खाचा डोंगर कोसळल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. मुलापाठोपाठ जन्मदात्या आईचे तिसºयाच दिवशी निधन झाल्याने एकच शोककळा पसरली आहे. रावेर येथील कन्हैयालाल अग्रवाल ट्रेडिंग कंपनीचे रोखपाल भगवान महाजन व उमाकांत महाजन यांच्या त्या मातोश्री तर रवींद्र महाजन यांच्या आजी होत.
विवाहीत मुलाच्या निधनाच्या मानसिक धक्क्याने तिसऱ्याच दिवशी वयोवृद्ध जन्मदात्या आईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:10 IST
बक्षीपूर येथील जेन्टस टेलर भास्कर वामन महाजन यांचे हदयविकाराने निधन झाल्याचा मानसिक धक्का बसला आणि त्यांची जन्मदाती वयोवृद्ध आई द्वारकाबाई वामन महाजन यांचे निधन झाल्याने गावावर दुहेरी शोकसावट पसरले आहे.
विवाहीत मुलाच्या निधनाच्या मानसिक धक्क्याने तिसऱ्याच दिवशी वयोवृद्ध जन्मदात्या आईचा मृत्यू
ठळक मुद्देबक्षीपूर येथील घटनाशोकाकुल परिवारावर दुहेरी शोकसावट