भुसावळजवळ अपघातात सावतर निंभोरा येथील वृध्द ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:25 IST2018-02-06T23:24:52+5:302018-02-06T23:25:59+5:30
दीपनगर आॅर्डनन्स फॅक्टरीजवळ झालेल्या अपघातात बाळू राजाराम कोळी (वय ५५ रा. सावतर निंभोरा) हे दुचाकीस्वार ठार झाले आहे तर किशोर रघुनाथ कोळी (वय ३३ रा. सावतर निंभोरा) हा तरुण जखमी झाला आहे.

भुसावळजवळ अपघातात सावतर निंभोरा येथील वृध्द ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, : दीपनगर आॅर्डनन्स फॅक्टरीजवळ झालेल्या अपघातात बाळू राजाराम कोळी (वय ५५ रा. सावतर निंभोरा) हे दुचाकीस्वार ठार झाले आहे तर किशोर रघुनाथ कोळी (वय ३३ रा. सावतर निंभोरा) हा तरुण जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता झाला. बाळू कोळी यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता मृत घोषीत करण्यात आले तर किशोर यांना खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
वाहतूक पोलीस जखमी
ड्युटी आटोपून घरी जाणा-या परेश महाजन (रा.दक्षता पोलीस लाईन, जळगाव) या जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाला मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिली. जळगाव शहरातील कोर्ट चौकात हा अपघात झाला.या अपघातात ते जखमी झाले असून खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. महाजन हे आकाशवाणी चौकातील त्यांच्या कार्यालयातून घरी जात होते.