एकोपा हा गावाच्या विकासासाठी दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:00+5:302021-09-14T04:20:00+5:30
तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विकासकांमांचे भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले. यात प्रामुख्याने तालुक्यातील बाभोरी प्र. ...

एकोपा हा गावाच्या विकासासाठी दिशादर्शक
तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विकासकांमांचे भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले. यात प्रामुख्याने तालुक्यातील बाभोरी प्र. चा येथे २५१५ अंतर्गत स्मशानभूमी परिसरात पेव्हर बसविणे- ६ लक्ष, भोकणी येथे गाव अंतर्गत नवीन गटार बांधकाम करणे-३ लक्ष, नवीन स्मशानभूमी बांधकाम-३ लक्ष, भोंकणी ते बाभोरी प्र. चा. रस्ता डांबरीकरण-१३ लक्ष अशा २५ लाख निधीच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, भिकन नन्नवरे, उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे , माजी सरपंच ईश्वर नन्नवरे, ग्रा. पं. सदस्य हिरामण नन्नवरे, नरेंद्र पाटील, पांडुरंग हिवरकर, सदाशिव पाटील, महेंद्र नन्नवरे, सुनील नन्नवरे, धनराज साळुंके, चंदन कळमकर, मंडळ अधिकारी अमोल पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, शाखा अभियंता एस. ए. सपकाळे उपस्थित होते.
130921\img-20210913-wa0041.jpg
???????? ?????????? ???????? ????? ??????? ????? ?????? ???? ???? ??????? ???.