जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांची दिल्ली येथे भेट घेतली. या वेळी तिघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.खडसे हे दिल्ली गेलेले असताना त्यांनी संसद भवन येथे जाऊन शहा व नड्डा यांची भेट घेतली. या संदर्भात खडसे यांनी सांगितले की, दिल्ली येथे अन्य कामासाठी गेले होतो. त्यामुळे येथे आलोच आहे म्हणून सदिच्छा भेट घ्यावी या उद्देशाने ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नड्डा यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते मुंबईत आले होते, त्या वेळी त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळेही त्यांना भेटण्यासाठी गेल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणूक अथवा इतर कोणत्याही राजकीय विषयावर ही भेट नव्हती तर केवळ सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीनंतर ते संध्याकाळी जळगावला येण्यासाठी निघाले.
एकनाथराव खडसे यांनी घेतली अमित शहा यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:02 IST