शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: युती भाजपनेच तोडली, फडणवीसांसारखे नेते तिथं होते; खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 09:36 IST

Eknath Shinde: गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर टिका करताना एकनाथ खडसेंचं उदाहरण दिलं होतं

जळगाव - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यात सभा घेत बंडखोर आमदारांना लक्ष्य केलं. शिवसेनेत बंडखोरी करण्यासाठी बंडखोर आमदारांना तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले. मात्र, पक्षासोबत गद्दारी करून या बंडखोर आमदारांना काय मिळाले, तर ‘बाबाजी का ठुल्लू’, असा घणाघात आदित्ययांनी पाचोरा येथील शिवसंवाद रॅलीत केला. अप्रत्यक्षपणे आदित्य यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर देत युती शिवसेनेनं नाही, तर भाजपनेच तोडली, असा गौप्यस्फोटही केला. 

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर टिका करताना एकनाथ खडसेंचं उदाहरण दिलं होतं. शिवसेनेसोबतची युती तोडणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासोबत कसे बसतात, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचाला होता. पाटील यांच्या या प्रश्नाचं उत्तर आता एकनाथ खडसेंनी दिलं आहे. ''शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय हा एकनाथ खडसेंचा नव्हता तर हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सामूहिक निर्णय होता, त्यात देवेंद्र फडणवीससारखे नेते होते. केंद्रातील भाजप सरकारची मान्यता या निर्णयाला होती, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला. 

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवीदीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याबाबत भाष्य केले होते. उध्दव ठाकरे यांनी ज्यांनी शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केले त्या भाजपसोबत बंडखोर गेल्याची टीका केली होती. याबाबत ते म्हणाले की, ज्या एकनाथराव खडसे यांनी युती तोडली त्यांच्या सोबतच तुम्ही बसले. तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का ? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. तर, आम्ही गद्दार नसून खुद्दार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरेंना गुलाबरावांचे उत्तर

आदित्य ठाकरे हे तरूण असून त्यांनी मंत्री बनल्याबरोबर राज्यभरात फिरावे अशी आमची सर्वांची इच्छा होती. मात्र, ते तेव्हा फिरले नाहीत. तर आता सत्ता गेल्यानंतर ते राज्यभरात फिरत आहेत. त्यामुळे आम्ही म्हणत होतो ते खरेच होते असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिवसेना वाचावी हा आमचा प्रयत्न होता. यासाठी आम्ही परिश्रम केले. मात्र त्यांनाच हे नकोसे होते असे दिसून आले. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील