शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...अन् एकनाथ खडसेंचा फोटो कॅबिनमधून हटवला; आमदार मंगेश चव्हाण यांनी दूधसंघाचा पदभार स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 11:16 IST

जळगाव जिल्हा दूध संघातलं खडसेंचे वर्चस्व खालसा, अध्यक्ष केबिनमधला फोटोही हटवला...

प्रशांत भदाणे 

जळगाव -  जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीनंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आला. या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

जळगाव जिल्हा दूध संघावर गेल्या सात वर्षांपासून एकनाथ खडसे यांचं वर्चस्व होतं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने दूध संघाची एकहाती सत्ता मिळवत खडसे यांचे वर्चस्व खालसा केले.

दूध संघाच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाची पहिलीच बैठक रविवारी सकाळी पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो तातडीने हटवण्यात आला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांचा फोटो पाठवण्यात आल्यासंदर्भात पत्रकारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा केली असता, मला कळत नाही अध्यक्षाच्या केबिनमध्ये खडसे यांचा फोटो कसा काय लागू शकतो. जिवंतपणी एखाद्या व्यक्तीचा फोटो कसा लावता येतो? प्रोटोकॉल असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचा लावू शकतो. पंतप्रधान, राष्ट्रपती तसंच मुख्यमंत्री यांचे फोटो लावता येतात. पण व्यक्तीचा फोटो लावता येत नाही. म्हणून निवडून आलेल्या सर्व संचालकांनी खडसेंचा फोटो खाली घेण्याची विनंती केली. त्यानुसार शिपायाच्या मार्फत आम्ही तो फोटो काढायला लावला, असे गिरीश महाजन म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजन