शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'मी टरबुज्या म्हणणार नाही, पण...', एकनाथ खडसेंनी डागली फडणवीसांवर तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 18:37 IST

भाजपमध्ये ४० वर्षे हमाली केली. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली.

जळगाव

भाजपमध्ये ४० वर्षे हमाली केली. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर खडसे बोलत होते. यावेळी खडसेंनी भाजपासहदेवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

'मी टरबुज्या म्हणणार नाही, पण मी मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावललं. मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला ७० वर्ष होऊन गेली, पण खान्देशावर अन्याय करण्यात आला', असेही खडसेंनी यावेळी सांगितलं.

उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदावर अधिकार होताआपल्या मनातील खदखद व्यक्त करताना खडसे पुढे म्हणाले की, गेल्या ७० वर्षांत कोकणातून नारायण राणे, मनोहर जोशी यांच्यासह ३ मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे विदर्भातील ४ मुख्यमंत्री झाले आणि पाचवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाला.  मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झाले. परंतु, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील एकही जण मुख्यमंत्री झाला नाही. उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदावर अधिकार असतानाही एकदाही संधी देण्यात आली नाही. ४० वर्ष पक्षात आम्ही हमाली केली. पण अधिकार असतानाही आम्हाला मुख्यमंत्रिपदापासून डावलण्यात आलं. हा तुमचा अपमान असल्याची खंतही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा