एक लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:55 IST2019-04-15T14:54:26+5:302019-04-15T14:55:07+5:30

अमळनेर येथील कारवाई : पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती

eka-laakhaacaa-gautakhaa-pakadalaa | एक लाखाचा गुटखा पकडला

एक लाखाचा गुटखा पकडला


अमळनेर : खाजगी वाहनातून सुमारे १ लाखाचा गुटखा वाहून नेणाऱ्या व्यापाºयास पोलिसांनी वाहनासह पकडले. ही कारवाई १४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवर करण्यात आली.
चोपडा रस्त्यावरून खाजगी वाहनातून शहरात गुटखा आणला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे , पोलीस नाईक किशोर पाटील, सुनील पाटील, कैलास सोनार यांना सोबत घेऊन सापळा लावला. त्यावेळी चोपडा रस्त्यावर वाहन क्रमांक एम. एच. ०३/ बी. इ. ५२६५ मधून विकी सुंदरदास बठेजा (रा. सिंधी कॉलनी) हा विमल गुटखा व तंबाखू चे पोते वाहून नेत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी एक लाख चार हजार पाचशे रुपयांचा गुटखा व तीन लाखाचे वाहन असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान अन्न भेसळ अधिकारी किशोर साळुंखे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यांच्या तपासणीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
दरम्यान, शहरातील ढेकू रोड , धुळे रोड वरून रात्री व पहाटे खाजगी लहान चारचाकी मधून गुटखा आणला जात असल्याची चर्चा असून पाळत ठेवून कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: eka-laakhaacaa-gautakhaa-pakadalaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.