शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटून ब्रेक निकामी झालेल्या चारचाकीने उडविले आठ जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:41 IST

 दुचाकी, पादचारीसह दिव्यांगाचाही समावेश

ठळक मुद्देकार, दुचाकी पोलीस ठाण्यात

जळगाव : अचानक टायर फुटल्याने त्यात ब्रेक निकामी होऊन भरधाव चारचाकीने एकामागून एक दुचाकी, पादचारी, रिक्षा व सायकलस्वाराला उडविल्याची थरारक घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजता डी मार्ट चौक ते तांबापुरातील शामा फायर व्यापारी संकुलादरम्यान घडली. या घटनेत दिव्यांग सायकलस्वारासह आठ जण जखमी झाले आहेत. चार जणांना जिल्हा रुग्णालयात तर चार जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, जलसंपदा विभागात (वाघुर धरण) विभागीय लेखाधिकारी असलेले संतोषकुमार सुमन (वय ३९, रा. मायादेवी नगर, जळगाव) हे त्यांच्याच विभागातील लिपीक प्रकाश अंबर पाटील (रा.संभाजी नगर, जळगाव) यांना सोबत घेऊन पाटील यांच्या कारने (क्र.एम.एच.१९ बी.जे. ८२५७) रविवारी सकाळी ११ वाजता घरुन वाघूर धरणाकडे जात असताना डी मार्ट चौकात अचानक चारचाकीचे डाव्या बाजुचे टायर फुटले, त्यामुळे कार चालवत असलेले संतोषकुमार यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यात भर पडली ती ब्रेक निकामी होण्याची. बे्रक लागत नसल्याने या कारने एकामागून एक दुचाकी, पादचाऱ्यांना धडक द्यायला सुरुवात केली. याप्रकारामुळे रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. शामा फायर व्यापारी संकुलाजवळ आल्यावर एका रिक्षावर (क्र.एम.एच.१९ व्ही.६३२) कार आदळल्याने तेथे जागेवर थांबली.मुलगी बचावली, वडील जखमीटी.व्ही.दुरुस्ती करण्यासाठी जात असलेल्या निशिकांत रामचंद्र कुळकर्णी ( ५४, रा.मोहननगर) यांच्या दुचाकीलाही कारने मागूनच धडक दिली. त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला आहे.कुळकर्णी यांच्या दुचाकीच्या मागे रिक्षात मुलगी पूर्वा ही टी.व्ही घेऊन जात होती. ती रिक्षात असल्याने बचावली. त्यानंतर फिरोज शेख अब्बास यांच्या रिक्षावर ही कार आदळली व तेथेच थांबली.कार, दुचाकी पोलीस ठाण्यातया घटनेत बबनराव ढेकणे, सुदाम एकनाथ पाटील हे देखील जखमी झाले आहेत. पाटील यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. अन्य तीन जण खासगी रुग्णालयात उपचार करुन घरी गेले. कारमधील लेखाधिकारी व लिपिकाने पोलिसांकडे धाव घेतली म्हणून ते जमावाच्या तावडीतून बचावले. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने ही अपघातग्रस्त कार पोलीस स्टेशनला आणण्यात आली.चारचाकीत जलसंपदाचे लेखाधिकारी व लिपीकया घटनेनंतर संतप्त नागरिक धावून आल्याने लेखाधिकारी संतोषकुमार व लिपीक प्रकाश पाटील यांनी तत्काळ इच्छादेवी पोलीस चौकी गाठली. तेथे पोलिसांना झाल्याप्रकाराची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर रस्त्यावर जखमी झालेल्या लोकांना तांबापुरातील लोकांनी खासगी व जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात एका वृध्दाची प्रकृती चिंताजनक आहे.मुलाला पर्स देताना दुचाकीवरुन पडल्याने महिला गंभीरचालत्या दुचाकीवर मुलाला पर्स देताना तोल जावून पडल्याने शोभा राजेंद्र भालेराव (४५, रा.पाळधी, ता.धरणगाव) या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाल्या आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेंद्र भालेराव हे पत्नी व मुलगा रिंकू असे तिन्ही जण पाळधी येथून शहरात बारशाचा कार्यक्रम तसेच मेळाव्यासाठी शहरात येत होते. पाळधी गाव सोडताच शोभा या दुचाकीवरुन पडल्या. डोक्याला मार लागून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दुचाकीस्वार दाम्पत्याला गंभीर दुखापतमोहाडी रोड येथून शहरात येत असलेले अनिल मनोहर वाणी (३१) व पत्नी रेखा ( २५) यांच्या दुचाकीला (क्र.एम.एच.१९ बी.एच.४८११) कारने मागून जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेल्या रेखा यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर अनिल यांच्या खांद्याला खरचटले आहे. रेखा या दवाखान्यात येईपर्यंत बेशुध्द होत्या. तसेच तीन चाकी रिक्षाने इच्छादेवी चौकाकडे जात असलेले सैय्यद रफिक सैय्यद रसुल (वय ५५, रा.समता नगर) यांनाही जबर दुखापत झालेली आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव