शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटणादेवी जंगलात आठ बिबटे; मोर, कोल्हे, काळवीट यांचेही दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:14 IST

प्राणी गणना पूर्ण

ठळक मुद्दे६५५३ हेक्टर क्षेत्रात झाले परीक्षणवैविध्यपूर्ण जैवविविधता

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २ - पाटणादेवी जंगल परिसरात ३० रोजी झालेल्या प्राणी गणनेत आठ बिबट्यांचे दर्शन झाले असून जंगलाच्या वेगवेगळ्या भागात त्यांचा अधिवास आहे. एकूण ६५५३ हेक्टर जंगल परिसरात १० निरीक्षण मनोरे उभारुन सलग २६ तास प्राणी गणना करण्यात आली. १५ कर्मचारी व काही वन्यजीव प्रेमी यात सहभागी झाले होते.बौद्ध पौर्णिमेला पहाटेपासूनच प्राणी गणनेला सुरुवात झाली. यासाठी नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांजवळ निरीक्षण मनोरे, मचाणही बांधण्यात आले होते. गणना सोमवार ते मंगळवारी सकाळी १० पर्यंत म्हणजेच सलग २६ तास करण्यात आली.बिबट्यांच्या परिवाराचे दर्शनप्राणी गणनेत पाच मोठे तर तीन बछडे अशा आठ बिबट्यांच्या परिवाराचे दर्शन झाले.पाटणादेवी निसर्ग केंद्राच्या मागे, गोमुखाकडे जाणा-या मारोती मंदिर परिसर आणि जुनोने जंगल परिसराच्या ३०९ झोन मध्ये बिबटे आढळून आले.वैविध्यपूर्ण जैवविविधताप्राणी गणनेत तडस- ११, भेकर- १०७, रानडुकरे- ९२६, काळवीट-३२, कोल्हे- १८, लांडगे-१३, नीलगायी- २१, चिंकरा- ५, सायाळ- ८, ससे- ५६, मोर- २७१, माकडे- ५२६ यासह दूर्मिळ पक्षी, अशा वन्यजीवांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.गेल्या काही वर्षात पाटणादेवी जंगल परिसरात चराईबंधीसह कु-हाडबंदी, शिकारबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदविले आहे.जंगलात अन्नसाखळी, सुरक्षित अधिवास, पाणवठ्यांची निर्मिती असे उपक्रम वनविभाग राबवित आहे. यामुळे प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेत देखील वाढ झाली आहे. ऊन्हाचा दाह लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे.सलग २६ तासाच्या गणनेत विविध प्राण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्राण्यांच्या संख्येत वाढही झाली आहे. प्राणी गणनेचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. पर्यटकांनी प्राण्यांना त्रास होईल असे वर्तन टाळावे.- एम. बी. पटर्वधन, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, चाळीसगाव.

टॅग्स :forestजंगलJalgaonजळगाव