वरणगावजवळील अपघातात आठ जखमी

By Admin | Updated: April 24, 2017 13:57 IST2017-04-24T13:57:58+5:302017-04-24T13:57:58+5:30

चारचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर सात जण जखमी झाल्याची घटना रात्री रात्री झाली.

Eight injured in accident near Varangaon | वरणगावजवळील अपघातात आठ जखमी

वरणगावजवळील अपघातात आठ जखमी

वरणगाव,ता.भुसावळ, दि.24- राष्ट्रीय महामार्गावरील बोहार्डी शिवारातील फौजी ढाब्याजवळ चारचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर सात जण जखमी झाल्याची घटना रात्री रात्री झाली. जखमींमध्ये बालकाचा समावेश आहे.
रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एमएच 12 एनयू 2212 हे चारचाकी वाहन मुक्ताईनगरकडून भुसावळकडे येत असताना जी.जे.23 व्ही 4545 या ट्रकने जोरदार धडक दिली. यात मुरलीधर शंकर कोळी, विजय कोळी, मनुबाई कोळी, शुभांगी कोळी, राहुल कोळी, रितिका कोळी, निशिकेश कोळी, विश्लेश कोळी (सर्व रा.दत्तनगर, भुसावळ) हे जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Eight injured in accident near Varangaon