जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST2021-05-28T04:13:53+5:302021-05-28T04:13:53+5:30

अमळनेर : धार रस्त्यावर मारुती मंदिराजवळील टेकडीवर झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याजवळील रोख रक्कम, ...

Eight gamblers arrested, | जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक,

जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक,

अमळनेर : धार रस्त्यावर मारुती मंदिराजवळील टेकडीवर झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याजवळील रोख रक्कम, सात मोटारसायकलीसह सुमारे तीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ किशोर पाटील, भूषण बाविस्कर, हितेश चिंचोरे, आशिष गायकवाड, राहुल पाटील, राहुल चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बल्ल्या मारुती मंदिराच्या टेकडीवर काटेरी झुडपात नितीन रामदास नगराळे (रा. फरशी रोड), रवींद्र चुडामण अहिरे (रा. मेघनगरी) , राजू रामचंद्र भोई (रा. झामी चौक), नीलेश अरविंद गवई (रा. ढेकू रोड), रवींद्र भूपेंद्र पाटील (धार), नरेश रघुनाथ चौधरी (रा. मराठे गल्ली, धरणगाव), काशीनाथ सुकलाल ठाकूर (रा. रामेश्वर नगर), जितेंद्र संजय पाटील (रा. कंकराज ता. पारोळा) यांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळील सात मोटारसायकली असा एकूण तीन लाख सात हजार रुपयाचा माल जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. आठही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सुनील हटकर करीत आहेत.

Web Title: Eight gamblers arrested,