हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले
By Admin | Updated: July 16, 2017 16:49 IST2017-07-16T16:49:09+5:302017-07-16T16:49:09+5:30
उगमस्थानावर पाऊस सुरू असल्याने तापी नदीवरील हतनूर येथील धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले
ऑनलाईन लोकमत
भुसावळ/वरणगाव,दि.16 - उगमस्थानावर पाऊस सुरू असल्याने तापी नदीवरील हतनूर येथील धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
शनिवारी व रविवारी जिल्ह्यातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. हतनूर धरणाच्या सर्वच भागात पाऊस झाल्याने रविवारी चार दरवाजे पूर्ण तर चार दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणाची 208 मीटर पाणी पातळी आहे. 159 दलघमी इतका पाणी साठा आहे. 140 क्युमेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे,असे धरणावरील सूत्रांनी सांगितले.