भुसावळात ईद उल फित्रची तयारी पूर्ण

By Admin | Updated: June 25, 2017 13:28 IST2017-06-25T13:28:06+5:302017-06-25T13:28:06+5:30

मैदानाची स्वच्छता : पाच हजार बांधव करणार नमाज अदा

Eid ul Fitr's preparation is complete in Bhusaval | भुसावळात ईद उल फित्रची तयारी पूर्ण

भुसावळात ईद उल फित्रची तयारी पूर्ण

राजू पटेल/ आॅनलाईन लोकमत

खडका, दि.२५ : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सोमवारी सांगता व याच दिवशी ईद उल फित्रची (रमजान ईद) नमाज  अदा करण्यासाठी खडका रोडवरील ईदगाह मैदानाची स्वच्छता करण्यात आली असून सोयी-सुविधा ईदगाह कमेटीतर्फे पुरवण्यात आल्या आहेत़
दरम्यान, एकाचवेळी सुमारे पाच हजारांवर समाजबांधव नमाज अदा करणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़
सुमारे एक महिन्यांपूर्वी पवित्र रमजान पर्वाला सुरुवात झाली होती़ या पर्वाची सोमवारी उत्साहात समाप्ती करण्यात येणार आहे. या निमित्त खडका रोडवरील प्रशस्त मैदानावर नमाज अदा केली जाणार आहे़ त्यानुषंगाने ईदगाह कमेटीतर्फे मैदानाची स्वच्छता करण्यात आली असून पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ रविवारी चंद्रदर्शनानंतर ईद साजरी करण्याबाबत निर्णय होणार आहे.
पाच हजार बांधवांची उपस्थिती
रमजान ईदची पवित्र नमाज अदा करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मुस्लीम बांधव ईदगाह मैदान तसेच जामनेर रोडवरील जुन्या ईदगाहवर जमणार आहेत़ याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छाही देणार आहेत़ दरम्यान, मुस्लीम कमेटीतर्फे सचिव अल्लाबक्ष लतीफ शहा व कमेटी सदस्यांनी मैदानाची पाहणी करून सोयी-सुविधांबाबत आढावा घेतला़ 

Web Title: Eid ul Fitr's preparation is complete in Bhusaval