चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ या संस्थेने शिक्षणा बरोबरच सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. शहर व परिसरात ठिकठिकाणी जलपुनर्भ रण प्रयोगांद्वारे जलसंकटावर मात करण्यासाठी संस्थेअंतर्गत सर्व घटकांना कटिबद्ध केले आहे.गेल्या काही वर्षांपासून अल्प पर्जन्यमानाच्या स्थितीमुळे शहर व तालुक्यातील जनता टंचाईच्या झळा सोसत आहे. भविष्यात या स्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्पावसाचा प्रत्ेक थेंब वाया नघालवता तो जमिनीत जि जिरविण्याचा संकल्प करीता संस्थेअंतर्गत सर्व इमारतींवरील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत जिरवण्यात येत आहे. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यासह राज्यात महात्मा गांधी शिक्षण मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यासह ग्रामीण भागातील पाणी पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय सर्व स्तरांतून होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. मंडळाने विविध विभागांच्या इमारतींच्या छतावरील पाणी परिसरात बंद पडलेल्या सात कूपनलिका व विहिरींमध्ये उतरवल्याने त्यांचे पनर्भरण होत आहे. त्यासाठी संस्थेकडून दहा लाख रुपये खर्च करून यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे भूगर्भार्तील पाण्याची पातळी वाढण्यात निश्चित मदत होणार आहे.
जलपुनर्भरणातून तालुक्याची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:34 IST