रद्दीदान सप्ताहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:46+5:302021-06-16T04:22:46+5:30
सर्वोदय माध्यमिक विद्यालय, उंबरखेड, पिलखोड, खेडगाव या शाळेवर शिक्षक पदावर कार्यरत असताना दरवर्षी होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ...

रद्दीदान सप्ताहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
सर्वोदय माध्यमिक विद्यालय, उंबरखेड, पिलखोड, खेडगाव या शाळेवर शिक्षक पदावर कार्यरत असताना दरवर्षी होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटत करत असत. ७ एप्रिल रोजी नाशिक येथे कोरोनाने त्यांचे निधन झाले. त्यांचा वीस वर्षांपासून चालू असलेला शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम असाच दरवर्षी पुढे चालू राहावा, यासाठी त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने एकत्र येऊन दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी बबिता अहिरे, वसुंधरा फाउंडेशन संस्थापक सचिन पवार, देवीदास खैरनार, प्रभाकर खैरनार, चित्रकार धर्मराज खैरनार, सविता खैरनार, बापूसाहेब खैरनार, कमलेश पवार, हर्ष अहिरे, दीपक खैरनार, सागर ठाकरे, रविराज परदेशी, अमोल मराठे, सचिन मोरे, घनश्याम कुलकर्णी, श्रावण मांडोळे, प्रदीप पाटील, मंगेश जोशी उपस्थित होते.