शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आयात शुल्क वाढल्याने खाद्य तेलाला महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 12:53 IST

१५ टक्यावरून ३० टक्यांवर शुल्क

ठळक मुद्दे प्रति किलो सात ते आठ रुपयांनी वाढसोयाबीनचे दर दीडपट

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ - सर्वात कमी दर असलेल्या पाम तेलाचे आयात शुल्क दुप्पट होण्यासह सोयाबीनच्या दरातही प्रति क्विंटल १२०० ते १३०० रुपयांनी वाढ झाल्याने पाम व सोयाबीन या खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे ‘बजेट’ कोलमडले आहे. दिलासादायक बाब म्हणजे शेंगदाणा तेल मात्र स्थिर आहे.दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाक घराच्या ‘बजेट’वर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चढ-उतार असलेल्या खाद्य तेलाच्या भावात आठवडाभरातच थेट सात ते आठ रुपये प्रति किलोने वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडका बसला आहे.आयात शुल्क दुप्पटएरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाºया या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे गेल्या आठवड्यात पाम तेलाचे ६८ ते ७० प्रति किलो असलेले भाव आता ७८ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.सोयाबीन तेलाच्या भावावरही परिणामसर्वात कमी भाव असलेल्या पाम तेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचेही भाव कडाडले आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलाचे भाव ७८ ते ८० रुपये प्रति किलो होते ते आता ८५ रुपयांवर पोहचले आहे. सोयाबीन तेलाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक भाव असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. यापूर्वी हे भाव जास्तीत जास्त ८३ ते ८४ रुपये प्रति किलोवर पोहचले होते.सोयाबीनचे दर दीडपटपाम तेलाच्या आयात शुल्कात वाढ होण्यापाठोपाठ आता देशातच तयार होणाºया सोयाबीन तेलाच्या बियाण्यांच्या भावातही दीडपट वाढ झाली आहे. पूर्वी २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल असलेले सोयाबीन आता ४००० रुपये प्रति क्विंटल झाले आहे. त्यामुळेही सोयाबीन तेलाचे भाव जास्त वाढण्यास मदत झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात या सर्व घडामोडी एकापाठोपाठ झाल्याने त्याचे परिणाम आता तेलाच्या भाव वाढीतून दिसून येत असल्याचेही व्यापाºयांनी स्पष्ट केले.वेफर्स, फरसानसाठी पाम तेलाचा वापर वाढलाजास्त दिवस ठेवण्यात येणारे कोरडे खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सोयबीन तेलाचा वापर केल्यास त्या पदार्थांचा येण्यास सुरुवात होते. त्यामुळे यासाठी आता पाम तेलाच्या वापरावर भर दिला जात आहे. अशाच प्रकारे वेफर्स व फरसान तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर वाढल्याने त्याची मागणी वाढली व भावदेखील वाढत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.शेंगदाणा तेल (११२ ते ११५ रुपये प्रति किलो) व तीळाच्या तेलाचे भाव (१६० रुपये प्रति किलो) मात्र स्थिर आहे.पाम तेलाच्या आयात शुल्कात वाढ व सोयाबीनचे दर वाढल्याने पाम तसेच सोयाबीन तेलाच्या भावामध्ये सात ते आठ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.- पंकज देवपुरा, तेल व्यापारी, जळगाव.

टॅग्स :JalgaonजळगावMarketबाजार