मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST2021-08-18T04:23:05+5:302021-08-18T04:23:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदीप्रकरणी जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्ष मंदाताई एकनाथ खडसे ...

मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदीप्रकरणी जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्ष मंदाताई एकनाथ खडसे यांना ईडीने पुन्हा नोटीस बजावली असून, १८ रोजी याप्रकरणी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मंदाताई खडसे यांना यापूर्वीही ईडीने हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती; मात्र प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहता येणार नसल्याचे सांगत मुदत मागून घेत तसे ईडीला कळविले होते. पहिली नोटीस बजावून बरेच दिवस झाल्यामुळे आता ईडीने पुन्हा नोटीस काढून बुधवारी सर्व कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात जिल्हा सहकारी बँकेलादेखील ईडीने नोटीस बजावून संत मुक्ताई शुगर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याचप्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. ईडीच्या नोटीसबाबत मंदाताई खडसे यांच्यासह खडसे कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.