शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

मान्सून लवकर; यंदा कापसाचे क्षेत्र ५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:26 IST

कृषी विभागाचा अंदाज : शेतकऱ्यांचा कल तृणधान्यांकडे राहणार

जळगाव : यंदा मान्सूनचे आगमन गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडे लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीदेखील खरीप हंगामाची तयारी सुरु केली असून यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी अधिक होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदाही चांगली राहणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक संकटे झेलणाºया शेतकºयाला यंदाचा मान्सून तरी दिलासा देईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तृणधान्याचा क्षेत्रात वाढ होणारयंदाच्या खरीप नियोजनानुसार मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात घट तर ज्वारी व बाजरी या पिकांखालील क्षेत्रात घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत यंदा तृणधान्याच्या पेरणीत वाढ होणार आहे. सोयाबीनचे बियाणे देखील भरपूर आहे. मात्र, लष्करी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने १ जूननंतरच पेरणी करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांनी लवकर पेरणी करू नये म्हणून २५ मे नंतर बाजारात बियाणे उपलब्ध होणार आहे.कर्जपुरवठा कमी झाल्याने होणार परिणामयंदा खरीपाच्या क्षेत्रात अजून काही प्रमाणात वाढ झाली असती मात्र, पीककर्ज पुरवठा चांगल्या प्रकारे न झाल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णात कर्जपुरवठा २ हजार ९२७ कोटींचा आराखडा असताना केवळ २८२ कोटींचे वाटप झाले आहे. यंदा लॉकडाऊन झाल्यामुळेरब्बीच्या पिकांची खरेदीअद्याप झालेली नाही. गेल्या वर्षाचा कापूस अजूनही शेतकºयांचा घरात पडून आहे. अशा परिस्थितीत कर्जाचा पुरवठा न झाल्यास शेतकºयांना खरीपाची तयारी करण्यास आर्थिक अडचणी निर्माण होवू शकतात.३७ हजार हेक्टर क्षेत्र वाढणारगेल्या वर्षी जून ते आॅक्टोबर या काळातील ५५ दिवसांत १४४ टक्के पाऊस झाला होता. शिवाय नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस झाला होता. यंदाही ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख २८ हजार ७४४ हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७५ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्णात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणीजिल्ह्णात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्णात ५ लाख १० हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख २५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.मुख्यमंत्री आज घेणार आढावा... मुख्यमंत्री गुरुवारी खरीप हंगामाचा आढावा घेणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याच्या स्थितीची माहिती देणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव