प्रत्येक शाळेला दोन बंधा:यांची सक्ती
By Admin | Updated: October 7, 2015 23:00 IST2015-10-07T23:00:01+5:302015-10-07T23:00:01+5:30
नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियानाला हातभार लागावा यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दोन वनराई बंधारे बांधण्याविषयीचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत.

प्रत्येक शाळेला दोन बंधा:यांची सक्ती
नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियानाला हातभार लागावा यासाठी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना किमान दोन वनराई बंधारे बांधण्याविषयीचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहेत. पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे अत्यंत आवश्यक आहे. वनराई बंधारा हा त्यासाठीचा सोपा उपाय आहे. जलसंवर्धनाचे शाळांमधून होणारे मूल्यसंस्कार व शाळांतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना हे सहज शक्य आहे. आपल्या गाव-शिवारातील वाहत्या नद्या, नाले किंवा ओढे यावर विद्याथ्र्याच्या मदतीने वनराई बंधारे बांधून आपला या अभियानास हातभार लावावा. पायाभूत चाचणीनंतर 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वनराई बंधारे बांधण्याचे अभियान राबवावे, असे शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे यांनी म्हटले आहे.