शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 11:35 IST

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

महिंदळे, ता. भडगाव : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या अकरावा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी व बोगस शेतकरी शोधण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र केवायसी करण्याकरिता शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी तासनतास सीएससी सेंटरवर बसलेले दिसतात.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात आर्थिक मदत मिळावी, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करून योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून, आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ई-केवायसीची पूर्तता केली तरच अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. परंतु सध्या ई केवायसी करण्याकरिता अनेक अडथळे येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सीएससी सेंटरमध्ये तासनतास बसावे लागत आहे. कधी साईट जाम तर कधीकधी ई केवायसी चालू असताना अचानक बंद होत आहे तसेच काही शेतकऱ्यांचे हाताच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांना केवायसी करिता मुकावे लागत आहे.

३१ मार्च शेवटची तारीखदेशभरात ११ कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादीनुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये, यासाठी आता ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी या योजनेतील १०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण, आता केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ११व्या हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कधी साईट चालत नाही तर कधी केवायसीवेळी हाताच्या बोटाचे ठसेच येत नसल्यामुळे केवायसी कशी पूर्ण करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहू लागला आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी