शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याचे ‘व्हाईट हाऊस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 01:00 IST

धुळे येथील पहिले शासकीय ग्रंथभवन साकारले आहे. याविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे उपसंपादक अतुल जोशी...

व्हाईट हाऊस म्हटल्याबरोबर अमेरिकेच्या राष्टÑाध्यक्षांचे निवासस्थान चटकन डोळ्यासमोर येते. मात्र धुळ्यातही ‘व्हाईट हाऊस’ साकारले आहे. मात्र हे कार्यालय अथवा निवासस्थान नाही, तर खान्देशातील पहिले वहिले शासकीय ग्रंथ भवन आहे. या ग्रंथभवनातच अभ्यास करून जिल्ह्यातील अनेक तरूण-तरूणी भविष्यातील आयएएस व आयपीएससह अधिकारी होण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हे ग्रंथभवन अर्थात ‘व्हाईट हाऊस’ धुळ्याचे ‘ज्ञान’ केंद्र झालेले आहे.धुळ्यात पूर्वी अगदी जुनाट शासकीय ग्रंथालय होते. मात्र आता तब्बल अडीच कोटी रूपये खर्च करून महाराष्टÑातील पहिले स्वमालकीचे ग्रंथभवन उभारण्यात आलेले आहे. या ग्रंथभवनात तरूण-तरूणींसह ज्येष्ठांसाठी पुस्तक वाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.गेल्या काही वर्षांपासून तरूणांचा कल आयएएस, आयपीएससह विविध विभागाचे अधिकारी होण्याकडे वाढलेला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थीही मागे नाहीत. या अभ्यासू तरूणांची सोय व्हावी म्हणून याठिकाणी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग सुरू करण्यात आलेला आहे. युपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे. याशिवाय दहावी-बारावीचे विद्यार्थीही याच ठिकाणी अभ्यास करीत असतात. दररोज किमान ३५० विद्यार्थी याठिकाणी अभ्यासासाठी येत असतात. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.गटचर्चेचा राबविला जातो उपक्रम स्पर्धा परीक्षेचा केवळ अभ्यासच नाही, तर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातून मुलाखतीची भीती घालविण्यासाठी याठिकाणी दररोज मुला-मुलींसाठी स्वतंत्र गटचर्चेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधूनच ग्रुप लीडरची निवड केली जाते. ग्रुपलीडर विद्यार्थ्यांना देशात, राज्यात चर्चेत असलेल्या एखाद्या ज्वलंत (करंट) विषयावर बोलण्यास भाग पाडतो.गटचर्चेत सहभागी होणाऱ्यांना मराठीसोबतच हिंदी, इंग्रजीत बोलण्यास प्रवृत्त केले जाते. यामुळे विद्यार्थी धाडसाने आपले मत मांडतात. यातून त्यांच्यात मुलाखतीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जातो. ग्रंथालयात गटचर्चा घेण्याचा महाराष्टÑातील हा पहिलाच उपक्रम आहे.विद्यार्थ्यांना जगातील शैक्षणिक साईट बघण्याची सुविधासध्याचे युग हे इंटरनेटचे आहे. कोणतीही माहिती पाहिजे असल्यास अनेकजण इंटरनेटचाच आधार घेत असतात. त्याला ‘शिक्षणक्षेत्र’ही अपवाद नाही. गरिब, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्येकवेळी सायबर कॅफेवर जाणे शक्य नाही. या गरिब विद्यार्थ्यांसाठी येथे डिजीटल विभाग सुरू केला आहे.येथे विद्यार्थ्यांना जगभरातील जवळपास २५० विविध प्रकारच्या वेबसाईट पाहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बेबसाईटच्या माध्यमातूनही विद्यार्थी अभ्यास करू शकतात. बेबसाईट पाहण्यासाठी या विभागात १५ संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.३६५ दिवस सुरू राहणारे ग्रंथालयहे ग्रंथालय वर्षातील ३६५ दिवस सकाळी ८ ते रात्री १० असे जवळपास १४ तास खुले राहते. शासकीय सुटी अथवा रविवारी कर्मचाºयांची सुटी असते. मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्रंथालय सुरूच असते अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी दिली.-अतुल जोशी, धुळे

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव