सहा जणांचे डझनभर अजर्

By Admin | Updated: December 10, 2015 00:12 IST2015-12-10T00:12:51+5:302015-12-10T00:12:51+5:30

धुळे : विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाकरिता काँग्रेसतर्फे अमरिशभाई पटेल आणि भाजपातर्फे गोपाळराव केले यासह 6 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले आहेत.

Duplicate application of six people | सहा जणांचे डझनभर अजर्

सहा जणांचे डझनभर अजर्

 

धुळे : विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाकरिता काँग्रेसतर्फे अमरिशभाई पटेल आणि भाजपातर्फे गोपाळराव केले या दोन प्रमुख उमेदवारांसह सहा उमेदवारांचे एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी अमरिशभाई पटेल, त्यांचे बंधू व अपक्ष उमेदवार भूपेशभाई पटेल, भाजपचे गोपाळराव केले, कामराज निकम, शशिकांत वाणी यांनी अर्ज दाखल केले.

अमरिशभाई यांच्यासोबत माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, ज्ञानेश्वर भामरे, जि.प.सभापती मधुकर गर्दे आदी उपस्थित होते.

गोपाळराव केले यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, नगरसेवक संजय गुजराथी उपस्थित होते. 12 डिसेंबर्पयत अर्ज माघारीची मुदत आहे.

काँग्रेसतर्फे अमरिशभाईंनाच एबी फॉर्म मिळाला. भाजपाने केलेंसोबत एबी फॉर्ममध्ये दुसरे नाव शशिकांत वाणी यांचे नोंदविले आहे.

भूपेशभाई पटेल यांनी अपक्ष तर कामराज निकम यांनी भाजपतर्फे अर्ज दाखल केला.

Web Title: Duplicate application of six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.