बिबटय़ाचा वनविभागाला गुंगारा

By Admin | Updated: October 5, 2015 00:33 IST2015-10-05T00:33:52+5:302015-10-05T00:33:52+5:30

कलमाडी :परिसरात आपली दहशत माजविणा:या बिबटय़ांना अद्यापदेखील जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे

Dumpster's dump | बिबटय़ाचा वनविभागाला गुंगारा

बिबटय़ाचा वनविभागाला गुंगारा

कलमाडी : तब्बल तीन वर्षापासून बोरद, मोडसह परिसरात आपली दहशत माजविणा:या बिबटय़ांना अद्यापदेखील जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

बोरद, मोडसह परिसरात गेल्या आठवडय़ापासून बिबटय़ा नेहमीच शेतक:यांना दिसून येत आहे. शिवाय शेतातदेखील बिबटय़ाची दहशत वाढली असल्याने फटाके उडवूनच शेतकरी जात आहेत. मात्र एवढी दहशत पसरविणा:या बिबटय़ाला जेरबंद करण्यास वनविभाग अद्यापही अपयशी ठरला आहे. नेहमीच हातावर तुरी देऊन निसटणारा बिबटय़ा कधी जेरबंद होईल हे आता वनविभागासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

तब्बल तीन वर्षापासून बोरद, मोड परिसरात बिबटय़ाचे अस्तित्व असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडय़ात तर बिबटय़ाने बछडय़ासह दिलेल्या दर्शनाने शेतकरीच काय संपूर्ण गावच दहशतीत आले आहे. त्यामुळे बिबटय़ाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. दहशतीमुळे ग्रामस्थ रात्री-अपरात्री बाहेर जाणे टाळत आहेत.

स्वतंत्र पथकाची गरज

बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी स्वतंत्र पथकाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक विभागामार्फत बिबटय़ाला जेरबंद करण्यास नेहमीच अपयश मिळत आहे. त्यामुळे प्रशिक्षित पथकाकडूनच बिबटय़ा जेरबंद होऊ शकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वास्तविक पाहता बोरदसह परिसरात नेहमीच बिबटय़ाचे अस्तित्व दिसून येत आहे. पण संबंधित विभाग अद्यापदेखील ठोस कार्यवाही करीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पण असे किती दिवस बिबटय़ाच्या दहशतीत जीवन जगतील, हाही गंभीर प्रश्न आहे. वनविभागाने आता तरी योग्य ती कार्यवाही करावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता यावर वनविभाग किती तत्परतेने कार्यवाही करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)

ग्रामस्थांचा जागता पहारा

बोरद : बोरद, मोड, कळमसरे परिसरात बिबटय़ाच्या दहशतीमुळे ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे.

कळमसरे येथे एका शेतक:याच्या गायीला बिबटय़ाने फस्त केल्यानंतर ग्रामस्थांमधील भीती अधिकच वाढली आहे. यामुळे ग्रामस्थांनी जागता पहारा दिला. त्यात उद्धव भगा पवार, देवीदास पवार, बिंद्या मोत्या ठाकरे, ब्रिजलाल पवार, राजू रतन मोरे, सुकलाल पवार, बालम मोरे, रामसिंग शिवाजी पवार, श्रावण पवार आदींचा समावेश आहे. वनपाल आर. बी. चांगणे व पांडुरंग जगताप यांनी उसाच्या शेतात गायीला शोधले तेव्हा मेलेल्या गायीचा सांगाडा सापडला. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

रात्री साडेदहाच्या सुमारास कळमसरे गावाजवळील नाला परिसरात बिबटय़ा आला. तेव्हा ग्रामस्थांनी आवाज करीत त्याला पळवून लावले.

दरम्यान, भगवान गोविंद लोहार व गुलाबसिंग गिरासे हे बसविण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर पाहण्यासाठी गेले तेव्हा बिबटय़ाने रस्ता ओलांडला. यामुळे येथून रस्ता ओलांडणारे मजूर भयभीत झाले.

बोरद येथील पांडुरंग जगताप, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती नरहर ठाकरे, वनरक्षक यशवंत मोरे, एस. बी. तावडे, नितीन पाटील, मंगेश पाटील, गिरधर पाटील, दीपक जाधव, राकेश जाधव यांनी बोरद गावात रात्री पहारा दिला. तेव्हा त्यांना बिबटय़ाची पावले आढळली. वनविभागाच्या कर्मचा:यांनी बिबटय़ाचे हे ठसे घेतले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dumpster's dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.