योगेश्वर नगरातून डंपरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:16 IST2021-03-26T04:16:18+5:302021-03-26T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कालंका माता मंदिर रस्त्यावरील योगेश्वर नगरात घरासमोर पार्किंग केलेले दहा लाख रुपये किमतीचे डंपर ...

योगेश्वर नगरातून डंपरची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कालंका माता मंदिर रस्त्यावरील योगेश्वर नगरात घरासमोर पार्किंग केलेले दहा लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९ झेड ९९१२) चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. दिलीप शामलाल पुरोहित (रा. योगेश्वर नगर) यांनी चोरीची फिर्याद दिली आहे.
राजेंद्र देवगिरी गोसावी, मोहन देवगिरी गोसावी व गौरव राजेंद्र गोसावी (सर्व रा. वेंकटेश नगर) यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास हवालदार परीष जाधव करीत आहेत. गोसावी परिवार वाळू व्यावसायिक व कंत्राटदार असून पुरोहित व गोसावी यांच्यात असलेल्या आर्थिक व्यवहारातून वाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात आता हे नवीन प्रकरण पुढे आले आहे. याबाबत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून सत्यता पडताळली जात असल्याचे तपासी अंमलदार परीष जाधव यांनी सांगितले.