डंपर उलटला, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 21:56 IST2019-09-06T21:56:10+5:302019-09-06T21:56:36+5:30

जामनेर येथील अपघात : मुरुम वाहतानाची घटना

Dumper reversed, driver injured | डंपर उलटला, चालक जखमी

डंपर उलटला, चालक जखमी


जामनेर : शहराजवळील गारखेडा घाटीजवळ सुमारे साडेबारा वाजेच्या दरम्यान भरधाव वेगात मुरुमाने भरलेले डंपर जामनेरकडे येत असतांना रस्त्याच्या मधोमध उलटले. यामुळे भुसावळ रोडवर काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
या अपघातामधे डंपर चालक किरकोळ जखमी झाला असुन सुदैवाने यावेळी इतर वाहन रस्त्यावर नसल्याने मोठा अपघात टळला आहे.
परिसरात अवैद्य गौणखनिजचे सर्रासपणे उत्खनन होत असून नैसर्गिक टेकड्या नेस्तनाबूत होत आहे. हा डंपर देखील अवैध मुरुम वाहतूक करत असल्याची चर्चा असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीही बेलफाटयाजवळ सावळदबारा कडे जाणाऱ्या एका डंपरने बसला कट मारल्यामुळे बस कलंडली होती.
सुदैवाने यात कोणाही प्रवाशांना इजा झाली नव्हती.
प्रशासनाने लक्ष दयावे
वाळूचे व मुरुमाचे डंपर सुसाट वेगाने नेहमीच वाहताना दिसतात. बºयाचदा अवैध वाहतूक असल्याने चालक घाई करताना दिसतात. यामुळे नेहमीच अपघात होत असून या वाहतुकीवर कारवाईची मागणी होत नागरिकांकडून आहे.

Web Title: Dumper reversed, driver injured