बॅँक खात्यातील पैशांवर ऑनलाइन डल्ला

By Admin | Updated: October 5, 2015 00:36 IST2015-10-05T00:36:22+5:302015-10-05T00:36:22+5:30

धुळे : बॅँकेचे बचत खाते व एटीएम कार्डविषयी गोपनीय माहिती भ्रमणध्वनीवरून विचारत एका विद्याथ्र्याच्या बॅँक खात्यातून 14 हजार रुपये काढून घेतल्याची घटना शनिवारी दुपारी 4.35 वाजेच्या सुमारास घडली.

Dump online in bank account money | बॅँक खात्यातील पैशांवर ऑनलाइन डल्ला

बॅँक खात्यातील पैशांवर ऑनलाइन डल्ला

धुळे : बॅँकेचे बचत खाते व एटीएम कार्डविषयी गोपनीय माहिती भ्रमणध्वनीवरून विचारत एका विद्याथ्र्याच्या बॅँक खात्यातून 14 हजार रुपये काढून घेतल्याची घटना शनिवारी दुपारी 4.35 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आलेल्या विद्याथ्र्याला नाहक पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

तू चांगला शिकलेला दिसतो.., मग माहिती कशी दिली.., आता काहीच होणार नाही.., गुन्हा दाखल करायचा असेल तर मुंबईला जावे लागेल.., अशी बेजबाबदार उत्तरे देऊन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी झटकली. त्यामुळे पैसे तर गेलेच; शिवाय चार गोष्टी ऐकून हिरमुसलेल्या विद्याथ्र्याला आल्या वाटेने माघारी परतावे लागले. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील रहिवासी असलेला वैभव किशोर जैन हा चांदवड, जि.नाशिक येथे एका महाविद्यालयात औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. कोचिंग क्लासेस सुरू असल्याने तो सध्या धुळ्यातील संतोषी माता चौकातील जैन वसतिगृहात राहत आहे. शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास वैभवच्या भ्रमणध्वनीवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलीकडून बोलणा:या व्यक्तीने वैभवच्या बॅँक ऑफ महाराष्ट्रचे बचत खाते व एटीएम कार्ड विषयीची गोपनीय माहिती विचारली. माहिती दिली नाही तर; खाते बंद होईल, असे त्या व्यक्तीने सांगितले.

Web Title: Dump online in bank account money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.