शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘एस.टी’ला लग्नसराईने लावली उत्पन्नाची हळद; दहा दिवसात २५ लाख प्रवाशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:33 IST

महामंडळाच्या तिजोरीत दररोज पडताय एक कोटी

जळगाव : यंदाची लग्नसराई एस.टी.महामंडळाच्या पथ्यावर पडली आहे. उन्हाळी सुट्यांनीही एस.टी.च्या उत्पन्नाला गारवा घातला असून दररोज अडिच लाखांवर प्रवासी एस.टी.ने प्रवास करीत आहेत. त्यामुळे दि.१ ते १० मेदरम्यान जळगाव विभागाला ९ कोटी ७७ लाख ९४ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

एस.टी.मंडळाच्या जळगाव विभागात नव्याने दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारी सेवा बंद करुन बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दररोज अडिच लाखांवर प्रवाशांचा प्रवास सुरु आहे.

एकही अपघात नाहीलग्नसराई आणि उन्हाळी सुटीच्या कालावधीत जळगाव विभागातील एकही बसचा अपघात झालेला नाही. ६६ बसेस सेवा देताना रस्त्यात बंद पडल्या आहेत. त्यावेळी अन्य बस उपलब्ध करुन प्रवाशांची उचल करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’दरम्यान, गर्दीचा हंगाम असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’ दिला गेला आहे. आवश्यकतेनुसार कमीत कमी सुट्या देऊन सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. विभागात ७४० बसगाड्या आहेत. त्यातील ११० नव्या बसेस लांब पल्ल्याची सेवेसाठी धावत आहेत.विभागाचे दैनंदिन उत्पन्न व आकडेवारी लाखात

दि.-         उत्पन्न -    प्रवासी१ मे-          ९३.१४-    २.५०२- ९९.५८-२.६३३-९८.६४-२.७१४-९८.९५-२.७२५-९३.६१-२.५३६-९२.१८-२.४४७-९६.४३-२.४३८-१०२.१७-२.६५९-१००.१२-२.६३१०-१०३.११-२.५३एकूण-९७७.९४-२५.७६

उत्पन्नाच्या तुलनेत जळगाव विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून जळगावची एस.टी. प्रवाशांना सुखकर सेवा पुरवित आहे. -भगवान जगनोर, विभाग प्रमुख.