पाळधी, ता.जामनेर - भाजीची चव वाढविणाºया टोमॅटोची भाव उतरल्याने ताटातील टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. दोन रुपये किलोने विक्री होत असलेल्या टोमॅटोचा उत्पन्न खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सद्या बाजारात भाजी पाल्याची, व फळभाज्यांची आवक वाढल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकºयांचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतात पिकविलेल्या मालाचे काय करावे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पाळधी येथे जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर एका शेतकºयाने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टेम्पोभर टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले. सद्दा टोमॅटोला किरकोळ बाजारात ५ रुपयेकिलो तर ठोक बाजारात किलोसाठी २ रुपये भाव आहे. त्यामुळे शेतकºयाने वैतागून टोमॅटो फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
अत्यल्प भावामुळे ताटातील टोमॅटो फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:37 IST
भाजीची चव वाढविणाºया टोमॅटोची भाव उतरल्याने ताटातील टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
अत्यल्प भावामुळे ताटातील टोमॅटो फेकले रस्त्यावर
ठळक मुद्देजळगाव-औरंगाबाद रस्त्यावर फेकले टोमॅटो रस्त्यावरदोन रुपये किलो भावामुळे शेतकऱ्यांनी फेकले टोमॅटोजगाचा पोशिंदा भाव नसल्याने झाला हवालदिल