शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

जळगावात पावणे दोन लाखाची लाच घेताना सहायक निबंधकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:34 IST

अहवाल अनुकुल देण्यासाठी घेतली लाच

ठळक मुद्दे एका हॉटेलमध्ये कारवाईलाठी वर्ग १ चा अधिकारी

जळगाव : गृहनिर्माण संस्था रद्द होऊ नये म्हणून अनुकुल अहवाल देण्यासाठी जळगावातील एका तक्रारदाराकडून पावणे दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना सहकार विभागाचा सहायक निबंधक मधूसुदन हरनिवास लाठी (रा.अमळनेर) या वर्ग १ च्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जळगावात रंगेहाथ पकडले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तक्रारदाराची गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेतील कार्यकारिणीत वाद आहेत. त्याचा निकालही तक्रारदाराच्या बाजूने लागलेला आहे. मात्र त्यावर काही जणांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सहकार विभागाचे सहायक निबंधक मधुसूदन लाठी यांचा अनुकुल अहवाल हवा होता. या अहवालासाठी लाठी यांनी तक्रारदाराकडे पावणे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार केली होती.हॉटेलमध्ये लावला सापळातक्रारदाराच्या तक्रारीची वेळावेळी पडताळणी झाल्यानंतर उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, हेडकॉन्स्टेबल श्याम पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर व महेश सोमवंशी यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता काव्यरत्नावली चौकातील एका हॉटेलमध्ये सापळा लावला. लाठी यांनी दीड लाखाची रक्कम स्विकारताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला मधुसूदन लाठी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.लाठी वर्ग १ चा अधिकारीमधुसूदन लाठी हा वर्ग १ दर्जाचा अधिकारी आहे. एरंडोल येथे सहायक निबंधक म्हणून त्याची मुळ नियुक्ती असून जळगावचा त्याच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. मू.जे.महाविद्यालय परिसरात एका कॅफेच्या वरच्या मजल्यावर सहकार विभागाच्या सहायक निबंधकाचे कार्यालय आहे. दरम्यान, लाठी याला अटक केल्यानंतर उपअधीक्षक ठाकूर यांचे पथक त्याला घेऊन अमळनेर येथील घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत घरझडती सुरु होती.दरम्यान, या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव