मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील चिंचोल येथील शेतकरी गजानन भागवत महाजन शेतातून घराकडे येत असताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटल्याने तो ट्रॅक्टरखाली दाबला जावून जागीच ठार झाला. ही घटना ३१ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान वडवे शिवारात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील चिंचोल येथील गजानन भागवत महाजन (३६) हा शेतकरी शेतामध्ये ट्रॅक्टर व पेरणी मशीन घेऊन गेलेला होता. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान शेतातून घराकडे येत असताना वडवे शिवारात त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली दाबले गेले व जागीच ठार झाले.याप्रकरणी श्रीराम महाजन रा.चिंचोल यांनी फिर्याद दिली. त्यावरून महेश गजानन महाजन हे स्वत:च्या मरणास स्वत:च कारणीभूत ठरले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विनोद हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहे.
चिंचोल येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली दबल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 19:32 IST
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील शेतकरी गजानन भागवत महाजन शेतातून घराकडे येत असताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटल्याने तो ट्रॅक्टरखाली दाबला जावून जागीच ठार झाला.
चिंचोल येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली दबल्याने मृत्यू
ठळक मुद्देशेतातून घराकडे येत असतानाची घटना नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले