रक्षाबंधननिमित्त युवतींनी जोपासले सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:04+5:302021-08-24T04:21:04+5:30
यावर्षीही कोरोनासारख्या भयावह महामारीत समाजाच्या रक्षणार्थ ज्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावले, अशा कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांना राखी बांधून युवतींनी पोलीस बांधवांविषयी ...

रक्षाबंधननिमित्त युवतींनी जोपासले सामाजिक भान
यावर्षीही कोरोनासारख्या भयावह महामारीत समाजाच्या रक्षणार्थ ज्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावले, अशा कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांना राखी बांधून युवतींनी पोलीस बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सर्वात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या लिंबाच्या झाडाला राखी बांधून भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भडगाव तालुका युवती सदस्यांकडून रक्षाबंधन साजरा केला. या उपक्रमात जिल्हा समन्वयक नेहा मालपुरे, तालुका मुख्य सचिव अश्विनी सोमवंशी, सचिव प्रतीक्षा सोनवणे, समन्वयक दर्शना गोसावी, प्रेरणा पाटील, अर्चना पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, स्वप्निल पाटील, रवींद्र पाटील, नितीन तुकाराम पाटील, अल्पेश कुमावत, वाहतूक नियंत्रित करणारे महाजन इत्यादी पोलीस बांधव आणि अजय कंडारे, संदीप पाटील, जगदीश चव्हाण, विजय कंडारे व सुबोध अहिरे उपस्थित होेते. फोटो - भडगाव पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यावेळी उपस्थित विद्यार्थिनी.