शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

पावसामुळे जिनिंगची कामे महिनाभर लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 18:58 IST

पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देबोदवड परिसरात कापूस उत्पादन दिवाळीनंतरचअति पावसाने कपाशी हाती येईना

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे. त्यातच अति पावसामुळे कापूस उत्पादनावरही मोठे परिणाम होणार असून, उत्पादनातील घट शेतकरी व जिनिंगचालकांना त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बोदवड तालुक्यात कापसाच्या उद्योगासाठी नऊ जिनिग प्रेसिंग आहेत, तर जिल्ह्यात ४८ रेचे असलेली एकमेव जिनिग तालुक्यात आहे. कापसाच्या सरकी, तेल, यावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग तालुक्यात असून बोदवडच्या कापसाला जिनिंग उद्योगाच्या जोडीने जगातील इंडोनेशिया, बांगलादेश पाकिस्तान, चीन या बाजारपेठेत जात असतो. या जिनिंगवर तालुक्याची आर्थिक स्थिती अवलंबून असून हजारो हातांना रोजगार देणारा कापूस हेच तालुक्यात प्रमुख पिक आहे. तर यंदा खरीप हंगामात बºयापैकी कापसाची लागवड झालेली असताना व पाऊस चांगला झाल्याने पिक चांगले येईल असे वाटत असताना कापसावर आता अस्मानी संकट कोसळले असून मुसळधार पावसामुळे कापसाच्या कैºया या झाडावरच सडत असून फुल, पानेही गळत आहेत, तर पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फटका शेतकºयाचे उत्पन्न घटण्यावर होणार आहे. पर्यायाने जिनिंगच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.महिनाभर हंगाम लोटला पुढेदरवर्षी जिनिंग प्रेसिंगचे उद्योजक नवीन कापूस खरेदी करून गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत जिनिंगचा शुभारंभ करत असतात. वर्षातील आठ महिने हा उद्योग रोजगार देऊन दिवाळी आनंदात साजरी केली जाते. मात्र यंदा पावसाने गणित फिरवले असून त्याचा परिणाम उद्योगवर झाला आहे. यंदा शेतातून चांगला व उच्च दर्जाचा वाळलेला कापूस दिवाळी नंतरच बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने महिनाभर हंगाम पुढे लोटला आहे. त्यामुळे आजघडीलाही जिनिंग सुरू झालेली नाही, तर दुसरीकडे अमेरिका व चीनचे व्यापारयुद्ध सुरू असल्याने जागतिक बाजारपेठेत कापूस गडगडला आहे. त्याचा परिणामही कापूस उद्योगांवर दिसून येत आहे.पावसाने शेतकरीवर्गासह जिनिंग उद्योगाची यावर्षी कसोटी आहे. अगोदरच अमेरिका व चीनच्या व्यापार युद्धाने कापसाला उठाव नसून, यंदा मंदीची झळही बसणार आहे. केंद्र सरकारच्या सीसीआयने कापूस खरेदीची तयारी ठेवावी. कारण जागतिक बाजारपेठेत कापसाला उठाव नसल्याने कापूस देशाबाहेर निर्यात होण्यात अडचण निर्माण होणार आहे.- अरविंद बरडिया, उपाध्यक्ष, खान्देश कापूस जिनिंग, बोदवड

टॅग्स :cottonकापूसBodwadबोदवड