पावसामुळे जिनिंगची कामे महिनाभर लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:54 PM2019-10-02T18:54:44+5:302019-10-02T18:58:24+5:30

पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे.

Due to the rain, the work of ginning will be extended for a month | पावसामुळे जिनिंगची कामे महिनाभर लांबणार

पावसामुळे जिनिंगची कामे महिनाभर लांबणार

Next
ठळक मुद्देबोदवड परिसरात कापूस उत्पादन दिवाळीनंतरचअति पावसाने कपाशी हाती येईना

गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे. त्यातच अति पावसामुळे कापूस उत्पादनावरही मोठे परिणाम होणार असून, उत्पादनातील घट शेतकरी व जिनिंगचालकांना त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बोदवड तालुक्यात कापसाच्या उद्योगासाठी नऊ जिनिग प्रेसिंग आहेत, तर जिल्ह्यात ४८ रेचे असलेली एकमेव जिनिग तालुक्यात आहे. कापसाच्या सरकी, तेल, यावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग तालुक्यात असून बोदवडच्या कापसाला जिनिंग उद्योगाच्या जोडीने जगातील इंडोनेशिया, बांगलादेश पाकिस्तान, चीन या बाजारपेठेत जात असतो. या जिनिंगवर तालुक्याची आर्थिक स्थिती अवलंबून असून हजारो हातांना रोजगार देणारा कापूस हेच तालुक्यात प्रमुख पिक आहे. तर यंदा खरीप हंगामात बºयापैकी कापसाची लागवड झालेली असताना व पाऊस चांगला झाल्याने पिक चांगले येईल असे वाटत असताना कापसावर आता अस्मानी संकट कोसळले असून मुसळधार पावसामुळे कापसाच्या कैºया या झाडावरच सडत असून फुल, पानेही गळत आहेत, तर पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फटका शेतकºयाचे उत्पन्न घटण्यावर होणार आहे. पर्यायाने जिनिंगच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.
महिनाभर हंगाम लोटला पुढे
दरवर्षी जिनिंग प्रेसिंगचे उद्योजक नवीन कापूस खरेदी करून गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत जिनिंगचा शुभारंभ करत असतात. वर्षातील आठ महिने हा उद्योग रोजगार देऊन दिवाळी आनंदात साजरी केली जाते. मात्र यंदा पावसाने गणित फिरवले असून त्याचा परिणाम उद्योगवर झाला आहे. यंदा शेतातून चांगला व उच्च दर्जाचा वाळलेला कापूस दिवाळी नंतरच बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने महिनाभर हंगाम पुढे लोटला आहे. त्यामुळे आजघडीलाही जिनिंग सुरू झालेली नाही, तर दुसरीकडे अमेरिका व चीनचे व्यापारयुद्ध सुरू असल्याने जागतिक बाजारपेठेत कापूस गडगडला आहे. त्याचा परिणामही कापूस उद्योगांवर दिसून येत आहे.

पावसाने शेतकरीवर्गासह जिनिंग उद्योगाची यावर्षी कसोटी आहे. अगोदरच अमेरिका व चीनच्या व्यापार युद्धाने कापसाला उठाव नसून, यंदा मंदीची झळही बसणार आहे. केंद्र सरकारच्या सीसीआयने कापूस खरेदीची तयारी ठेवावी. कारण जागतिक बाजारपेठेत कापसाला उठाव नसल्याने कापूस देशाबाहेर निर्यात होण्यात अडचण निर्माण होणार आहे.
- अरविंद बरडिया, उपाध्यक्ष, खान्देश कापूस जिनिंग, बोदवड

Web Title: Due to the rain, the work of ginning will be extended for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.