पीक विमा रक्कम अदा न झाल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:14+5:302021-09-07T04:22:14+5:30
फैजपूर जि. जळगाव : फळपीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा न केल्याने फैजपूर आय.सी.आय.सी.आय. बँकेविरुद्ध ...

पीक विमा रक्कम अदा न झाल्याने
फैजपूर जि. जळगाव : फळपीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा न केल्याने फैजपूर आय.सी.आय.सी.आय. बँकेविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर येथील तीन बॅंकांमधील तत्कालीन शाखा व्यवस्थापक, मुक्ताईनगरला दोन बॅंका तसेच सावदा येथील दोन बॅंक शाखाधिकारी यांच्याविरुद्ध यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे गुन्हे दाखल झालेले शाखाधिकारी व बॅंकांची संख्या आता दहा झाली आहे.
तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल आहे. यावल तालुक्यातील २७ शेतकऱ्यांना ४७ लाख ३५ हजार ४१ रुपये हवामान आधारित पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम फैजपूर आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या हलगर्जीपणामुळे मिळू शकली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बॅंकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर व पोलीस काॅन्स्टेबल अमजद पठाण करीत आहेत.