आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - पोटात शस्त्राचा मार लागून गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री दाखल केलेल्या आकाश वाघ (२०, रा. मांडवे दिगर, ता. जामनेर) या रुग्णावरील शस्त्रक्रियेसाठी वेळेवर भूलतज्ज्ञ उपलब्ध न होऊ शकल्याने अखेर त्याला धुळे येथे हलवावे लागल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला. या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.आकाश याला शस्त्राचा मार लागून पोटातील आतडी बाहेर आली होती. गंभीर अवस्थेत त्याला शुक्रवारी मध्यरात्री १.२० वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी उपचार केले. मात्र आतडी बाहेर आल्याने शस्त्रक्रिया करणे गरेजेचे होते. त्यासाठी दुसरे वैद्यकीय अधिकारीही हजर झाले. मात्र भूलतज्ज्ञ रुग्णालयात नसल्याने भूलतज्ज्ञांशी संपर्क साधून बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे रुग्णास धुळ््याला हलविण्याची वेळ आली.या बाबत मात्र डॉ. बिराजदार यांनी सांगितले की, भूलतज्ज्ञांशी संपर्क झाला मात्र त्यांना पोहचण्यास वेळ लागणार असल्याने व तो पर्यंत आतड्यांची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला धुळे येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
भूलतज्ज्ञाअभावी गंभीर रुग्णाला धुळे येथे हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:26 IST
जळगाव जिल्हा रुग्णालयात अनास्था
भूलतज्ज्ञाअभावी गंभीर रुग्णाला धुळे येथे हलविले
ठळक मुद्देमांडवे दिगर येथील रुग्णाचे हालव्यक्त केला नातेवाईकांनी संताप