मदत करण्याच्या बहाण्याने दोन महिलांचे पैसे लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:57 IST2017-09-25T22:55:38+5:302017-09-25T22:57:51+5:30
मदत करण्याच्या बहाण्याने हातातील पिशवी घेऊन बसपर्यंत सोडायला आलेल्या एका महिलेने कासाबाई नामदेव गव्हाळे (वय ७० रा.निंबोल, ता.रावेर) या वृध्देच्या पिशवीतील एक हजार रुपये तर खिर्डी, ता.रावेर येथील शोभा तोताराम राठोड (वय ५२) या महिलेल्या पिशवीतील पाच हजार रुपये लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता नवीन बसस्थानकात घडली. सलग दुसºया दिवशी चोरी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही महिलांकडे भाड्यालाही पैसे नसल्याने लोकांनी पैसे गोळा करुन त्यांना रवाना केले.

मदत करण्याच्या बहाण्याने दोन महिलांचे पैसे लांबविले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२५ :मदत करण्याच्या बहाण्याने हातातील पिशवी घेऊन बसपर्यंत सोडायला आलेल्या एका महिलेने कासाबाई नामदेव गव्हाळे (वय ७० रा.निंबोल, ता.रावेर) या वृध्देच्या पिशवीतील एक हजार रुपये तर खिर्डी, ता.रावेर येथील शोभा तोताराम राठोड (वय ५२) या महिलेल्या पिशवीतील पाच हजार रुपये लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता नवीन बसस्थानकात घडली. सलग दुसºया दिवशी चोरी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही महिलांकडे भाड्यालाही पैसे नसल्याने लोकांनी पैसे गोळा करुन त्यांना रवाना केले.
शोभा राठोड यांचे खिर्डी येथे ब्युटी पार्लर आहे. सोमवारी त्या पार्लरचा सामान घेण्यासाठी जळगावात आल्या होत्या. हा सामान घेतल्यानंतर घरी जाण्यासाठी दुपारी अडीच वाजता बस स्थानकात आल्या. तीन वाजता जळगाव-रावेर या बसमध्ये चढताना एका हातात पार्लरचा सामान तर दुसºया हातात आणखी एक पिशवी होती. या पिशवीत लहान पर्स होती. त्यात पाच हजार रुपये रोख व काही कागदपत्रे होती. बसमध्ये चढल्यानंतर हातातील पिशवीमधील पर्स काढण्यासाठी चैन उघडली असता पर्स गायब झाली होती. त्याच वेळी या बसमध्ये चढणाºया कासाबाई आल्या. त्यांच्याही पिशवीतील कमरेची लहान पिशवी गायब झाली होती. त्यात एक हजार रुपये होते.