यावर्षी कापसाचे पीक पाहून शेतकरी आनंदित होते. मात्र दहा दिवसांनंतर कापूस शेतीचे सर्व चित्र बदलल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अतिपावसामुळे कापूस या झाडाची मुळे बुरशीने नष्ट झाली. त्यामुळे शेतातील बहुसंख्य कापसाची झाडे उभवू लागलेली आहेत. काही शेतकऱ्यांचा चार एकर, पाच एकर क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रामध्ये संकरित कापूस उभवून गेलेला आहे. म्हणजेच मूळ नष्ट झाल्याने ते झाड पूर्णपणे जळून खाक होऊन जाते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
सुरुवातीचे अडीच ते तीन महिने पीक जोमात होते. मात्र अचानक या अकरा ते बारा दिवसांच्या रिपरिप पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांवर संक्रांत आली आहे. एकीकडे मूग, सोयाबीन, उडीद, चवळी, तूर, सूर्यफूल, तीळ यासारखी पिके नष्ट झाली असताना कापसाची आशा असलेल्या शेतकऱ्यांना मात्र आता त्यांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. काळीशार किंवा काळी मातीच्या जमिनीमध्ये कापूस उभविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहेत. मुरमाड जमिनीत त्यामानाने उभविण्याचे प्रकार कमी दिसत असले तरी काळी जमिनीवरचा कापूस उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यासोबतच अतिपावसामुळे झाडावर फुल फुगडीचा बहर जो आलेला होता, तो सर्व खाली गळून गेलेला आहे. तसेच ज्या कैऱ्या पक्व झालेल्या त्या काही अतिपावसामुळे सडायला लागलेल्या आहेत. म्हणजेच कापूस पिकावर यावर्षी मोठे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही शेतकरी बुरशीनाशक औषधी मुळांजवळ ड्रिंचिंग करून झाडे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सातत्याचा पाऊस असल्याने ड्रिंचिंग करण्याचा उपयोग होणार नसल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
120921\20200821_143858.jpg
???????? ????? ???